
माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – तुलानमेंढा येथील युवा मित्र क्रिकेट क्लबच्या सौजन्याने आयोजित आमदार चषक भव्य रबरी बॉल हॉप पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष.खेमराजजी तिडके तालुकाध्यक्ष कॉं.क.ब्रम्हपुरी,या कार्यक्रमाचे.सहउद्घाटक.जगदिश पुराम ग्रा.प.सदस्य तु.मेंढा,प्रमुख अतिथी.राजकुमार कुत्तरमारे सरपंच तु.मेंढा, दिवाकर गेडाम तु.मेंढा,चंद्रभान शेंडे तु.मेंढा,विलास गेडाम तु.मेंढा,सचिन पुराम,देवराव आळे,अशोक चिंचाळकर, प्रभाकर भोयर,नितेश ठाकरे,अतुल मेश्राम,आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
उद्घाटनीय भाषणात प्रमोदभाऊ चिमूरकर यांनी ग्रामीण भागातील क्रिकेट स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले. अशा स्पर्धांमुळे स्थानिक तरुणांना सकारात्मक दिशा मिळते, खेळाच्या माध्यमातून सामाजिक साक्षरता वाढते आणि युवकांच्या कौशल्याला चालना मिळते, असे त्यांनी नमूद केले.
ही स्पर्धा क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणी ठरली. मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी उपस्थित राहून खेळाचा आनंद घेतला. उत्कृष्ट नियोजनामुळे स्पर्धा यशस्वी झाली. ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारी व खेळसंस्कृतीला चालना देणारी ही स्पर्धा असल्याचे सर्व उपस्थितांनी एकमताने व्यक्त केले.















