prabodhini news logo
Home ठळक बातम्या कुपवाडमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याची जोरदार मागणी

कुपवाडमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याची जोरदार मागणी

0
151

वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे शिष्टमंडळ आयुक्तांसह महापालिकेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना धडकले!

१५ दिवसांत निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाची महापालिकेला जाहीर इशारा!

शहरातील बहुजन समाजाचा संताप उसळला!

सांगली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. ०१/०४/२०२६ कुपवाड शहराच्या सामाजिक प्रतिष्ठेचा प्रश्न ठरलेल्या महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी आज वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्ह्याकडून महापालिका प्रशासनावर भक्कम टोकाची धडक देण्यात आली.
बुधवार, दि. ०१ एप्रिल २०२६ रोजी युनियनच्या भव्य शिष्टमंडळाने सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, महापौर धीरज सुर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदुम, स्थायी समिती सभापती अतुल माने, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, समाजकल्याण समिती सभापती गीताताई पवार तसेच नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, रविंद्र सदामते, नगरसेविका प्राजक्ताताई धोत्रे यांना तगडा व कडक शब्दातील लेखी निवेदन देऊन प्रशासनाला चांगलेच सोनं घातले.

कुपवाडमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अद्याप पुतळा नाही – बहुजन समाजाचा संताप शिगेला
सांगली आणि मिरजमध्ये भव्य पुतळे असूनही, संयुक्त महापालिकेतील तितकेच महत्त्वाचे शहर असलेल्या कुपवाडला आजपर्यंत बाबासाहेबांचा एकही पूर्णाकृती पुतळा नाही, ही मोठी सामाजिक अन्यायाची बाब असल्याचे शिष्टमंडळाने स्पष्टपणे निदर्शनास आणून दिले.
महावीर व्यायाम मंडळाशेजारील महापालिकेच्या मध्यवर्ती खुल्या भूखंडावर त्वरित स्थळनिश्चिती करून भव्य स्मारक उभारण्यात यावे, ही युनियनची ठाम मागणी आहे.

“१५ दिवसांत निर्णय न घेतल्यास आंदोलन!” – युनियनचा खणखणीत इशारा
प्रशासनाने या मागणीवर १५ दिवसांत ठोस निर्णय न घेतल्यास—
* कुपवाड शहरात तीव्र आंदोलन उभारले जाईल
* विस्तृत लोकचळवळ उभी केली जाईल
* आवश्यक असल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल
असा स्पष्ट आणि निर्धारपूर्ण इशारा निवेदनात देण्यात आला.

शिष्टमंडळात सहभागी प्रमुख नेतृत्व
या भव्य धडक मोर्च्यासारख्या शिष्टमंडळाचे नेतृत्व प्रशांत वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव संजय भूपाल कांबळे, जिल्हा संपर्कप्रमुख संजय संपत कांबळे, जिल्हाध्यक्ष अनिल मोरे, महासचिव मोहन साबळे, मनपा क्षेत्राध्यक्ष विनायक मोरे, वंचित बहुजन आघाडी सांगली शहराध्यक्ष शिवाजी उर्फ पवन वाघमारे, जिल्हाध्यक्ष – सम्यक विद्यार्थी आंदोलन तसेच सचिन कोलप, राजू धेंडे, किशोर आढाव, जगदीश कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांचा मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
प्रशासनाचे लक्ष वेधत जनआक्रोश मांडला गेल्याने महापालिका मुख्यालयात चांगलीच खळबळ माजली.

कुपवाडकरांचा ऐतिहासिक व न्याय्य हक्क – युनियनची ठाम भूमिका
युनियनच्या निवेदनानुसार—
कुपवाड शहराला डॉ. बाबासाहेबांचे प्रेरणास्थान असणे आवश्यक आहे.
बहुजन समाज, कामगार, विद्यार्थी व सामाजिक संघटनांची ठोस मागणी आहे.
शहराच्या सामाजिक-सांस्कृतिक इतिहासात महत्वाची भर पडेल.

कुपवाड शहरात बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा प्रश्न आता जनआंदोलनाचा विषय झाला आहे.
महापालिकेने तातडीने निर्णय घेतला नाही तर येत्या काही दिवसांत कुपवाडात तीव्र संघर्ष पेटण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here