
शंकरपूर : श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ काला उत्सवानिमित्त शंकरपूर व परिसरातील जनतेचे आराध्य दैवत हनुमान किल्ला मंदिर येथे तृष्णानंद पानपोई या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रखर उन्हामुळे त्रस्त झालेल्या भाविक भक्तांना थंड पाण्याचा गारवा मिळावा आणि त्यांच्या शरीराची तृष्णा शमावी, या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.
महाभारत ग्रुप अँड फ्रेंड्स कराओके मेलोडी मेकर्स, शंकरपूरचे संस्थापक संजयसिंह बघेल आणि प्रा. शैलेश वाघधरे यांच्या प्रेरणेतून गेल्या दहा वर्षांपासून हा समाजोपयोगी उपक्रम सातत्याने सुरू आहे. यावर्षीही दिनांक ७ एप्रिल २०२६, मंगळवार रोजी सकाळी ९.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत एकदिवसीय पानपोईचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमासाठी महाभारत ग्रुप अँड फ्रेंड्स कराओके मेलोडी मेकर्सच्या सर्व सभासदांनी व हितचिंतकांनी उत्स्फूर्त श्रमदान करत मोलाचे योगदान दिले. प्रमुख सहकार्यकर्त्यांमध्ये संजय जयस्वाल, राजेश एलसट्टीवार, शैलेश गायकवाड, बंडू चौधरी, नंदू तिवारी, प्रा. एकनाथ खाडे, नारायण चौधरी, मनोहर भानारकर, रामेश्वर भानारकर, दीपक चंदेल, रणजीत वाघधरे, भोजराज सहारे, पिंटू चाचरकर, व्यंकटराव चाचरकर, अनिल बिसने, राजूभाऊ भांडारकर आदींचा समावेश होता.
या उपक्रमामुळे मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला असून, समाजसेवेचा हा आदर्श उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. नागरिकांकडून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.















