
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – सिंदेवाही (चंद्रपूर):भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा पूर्व अंतर्गत, तालुका शाखा सिंदेवाहीच्या वतीने ग्राम शाखा विरव्हा जुना येथे भगवान बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा ५ मे २०२६ रोजी तीन सत्रांमध्ये अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्याला परिसरातील बौद्ध बांधवांनी मोठी उपस्थिती दर्शविली होती.
भव्य मिरवणूक आणि विधिवत प्रतिष्ठापना
पहिले सत्र: समता सैनिक दलाच्या शिस्तबद्ध पथसंचलनासह भगवान बुद्धांच्या मूर्तीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
दुसरे सत्र: पूजनीय भन्ते संघवंश (मूल) यांच्या उपस्थितीत मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
याप्रसंगी भन्तेजींनी उपस्थितांना धम्मदेसना दिली.विहार हे ज्ञानसाधनेचे केंद्र बनावे: डॉ. राजपाल खोब्रागडे

तिसऱ्या सत्रात प्रबोधन व मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा पूर्वचे अध्यक्ष डॉ. राजपाल खोब्रागडे यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी भगवान मेश्राम होते.उद्घाटनपर भाषणात डॉ. खोब्रागडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेचे १० प्रमुख उद्देश सविस्तर समजावून सांगितले. “बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रत्येक गावात बुद्ध विहार असले पाहिजे. हे विहार केवळ प्रार्थनेचे स्थळ नसून ज्ञानसाधनेचे केंद्र बनले पाहिजे. प्रत्येकाने दर रविवारी विहारात येऊन धम्म आत्मसात करावा,” असे आवाहन त्यांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती व मार्गदर्शन
याप्रसंगी बौद्ध धम्माचे अभ्यासक प्रा. डॉ. रवी कांबळे, प्रा. प्रताप नगराळे, लोमेश खोब्रागडे, अनिल मेश्राम, मेजर जनरल दीपक मोटघरे, जी. एम. बाबोळे (शहराध्यक्ष, मूल), बलदेव चाहदे आणि गजानन मेश्राम यांनी उपस्थितांना योग्य मार्गदर्शन केले.
नियोजन व सहभाग
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बोरकर यांनी केले. सूत्रसंचालन सिंदेवाही तालुका अध्यक्ष अंबादास कोसे यांनी केले. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी नैनपूर, लाडबोरी, नवेगाव, लोनखरी, कळमगाव गन्ना, पेटगाव आणि मूल येथील समता सैनिक दलाचे सैनिक व बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.















