



राजुरा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – ॲड. वामनराव चटप यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त भवानी माता मंदिर, राजुरा येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर शेतकरी संघटना राजुरा विधानसभा क्षेत्र व अग्निपंख बहुउद्देशीय संस्था राजुरा यांच्या संकल्पनेतून, तसेच शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर यांच्या सहकार्यातून आयोजित करण्यात आले.
विविध गाव-खेड्यांतून आलेल्या नागरिकांनी शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून निःशुल्क आरोग्य सेवेचा लाभ घेतला. एकूण ६५० रुग्णांनी नोंदणी करून विविध आजारांची तपासणी करून घेतली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकांनी सर्व रुग्णांची सविस्तर तपासणी केली.
तपासणीदरम्यान ७० रुग्णांना सर्जरी किंवा पुढील वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्याचे निष्पन्न झाले आहे. या रुग्णांना येत्या दोन ते तीन दिवसांत नागपूर येथे रुग्णवाहिकेद्वारे रवाना करण्यात येणार आहे. सर्जरी व पुढील उपचार पूर्णपणे मोफत असून ते शासकीय योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.
आर्थिक टंचाईमुळे कुणीही वंचित राहू नये, गरजू रुग्णांना योग्यवेळी उपचार मिळावेत, यासाठी हा उपक्रम विशेषतः राबविण्यात आला आहे.यामध्ये महत्वाची बाब म्हणजे ॲड वामनराव चटप यांची जिलेबी तुला करण्यात आली. वाढदिवसानिमित्त आयोजित हा सामाजिक उपक्रम जनतेकडून मोठ्या प्रमाणात दाद मिळवत असून सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.वाढदिवसानिमित्त शिबीर संयोजक ॲड. दीपक चटप, राजुरा नगराध्यक्ष अरुण धोटे, गडचांदूर नगराध्यक्ष निलेश ताजणे, राजुरा नगर परिषद उपाध्यक्ष दिलीप देरकर, जेष्ठ नेते ॲड मुरलीधर देवाळकर,गडचांदूर न. पं. उपाध्यक्ष संजय मेंढी, सहकारी बँकेचे माजी सचिव विलास धांडे, अरुण पाटील नवले, प्राचार्य सतिश मोहितकर, प्रा.ज्योत्स्ना मोहितकर, बाजार समितीचे माजी सभापती प्रभाकर ढवस, जि.प.चे माजी सभापती निळकंठ कोरांगे,कवडू पोटे पाटील, बाजार समिती राजुराचे संचालक दिलीप देठे, उपनगराध्यक्ष न.प.राजुराचे नगरसेवक रमेश नळे, स्वप्नील मोहुर्ले,किशोर हिंगाने,पौर्णिमा सोयाम सिद्धार्थ पथाडे, गीता पथाडे, तसेच रवी गोखरे, हरिदास बोरकुटे, शेषराव बोंडे,कपिल इद्दे,मधुकर चिंचोलकर, विलास अंदनकर,माजी उपनगराध्यक्ष सुनिल देशपांडे, मार्निंग गृपचे मसूद अहमद, डाॅ.उमाकांत धोटे, प्राचार्य संभाजी वारकड, पतंजली योग समितीचे पुंडलिक उराडे,खुशाल अडवे, दीपक देरकर,सूरज गव्हाणे,साईनाथ पिंपळशेंडे,वैभव अडवे,समाधान लडके,सौरभ मादासवार,यांच्यासह राजुरा, कोरपना, गोंडपिपरी व जिवती तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.















