prabodhini news logo
Home एटापल्ली अखेर रेखाभटाळ गावातील बंद हातपंप दुरुस्त; भाकपा ने जनतेने दिलेले शब्द पूर्ण...

अखेर रेखाभटाळ गावातील बंद हातपंप दुरुस्त; भाकपा ने जनतेने दिलेले शब्द पूर्ण केले

0
41

एटापल्ली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : तालुक्यातील ग्रामपंचायत गर्देवाडा अंतर्गत रेखाभटाळ गावातील झुरु काऱ्या गावडे यांच्या घरासमोरील अनेक महिन्यांपासून बंद असलेला हातपंप अखेर दुरुस्त करण्यात आला असून गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सदर हातपंप हा परिसरातील अत्यंत वापरातील व प्रमुख पाण्याचा स्रोत असल्यामुळे त्याच्या बंद अवस्थेमुळे गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली होती. महिलांना, वृद्धांना व लहान मुलांना दूरवरून पाणी आणावे लागत होते, तसेच अपुऱ्या व अस्वच्छ पाण्यामुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला होता.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची टंचाई अधिकच तीव्र झाली होती. पाण्यासाठी रांगा लागणे, वेळेचा अपव्यय व वादविवाद वाढण्याच्या घटना घडत होत्या. जनावरांच्या पाण्याचीही गंभीर अडचण निर्माण झाली होती.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत भाकपा पक्षाच्या वतीने संबंधित प्रशासनाकडे हातपंप तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. भाकपा च्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे व कॉ. सचिन मोतकुरवार (जिल्हा सहसचिव, भाकपा गडचिरोली) यांनी विशेष लक्ष घालून पाठपुरावा केल्यामुळे ही दुरुस्ती लवकर करण्यात आली.

याबाबत कॉ. सचिन मोतकुरवार यांनी सांगितले की, “जनतेच्या सेवेत आम्ही नेहमी हजर आहोत. गावात कोणतीही समस्या असल्यास गावकऱ्यांनी आम्हाला नक्की बोलवावे. तसेच प्रशासनानेही मूलभूत सुविधांकडे वेळेत लक्ष देणे गरजेचे आहे, जेणेकरून अशा समस्या पुन्हा उद्भवणार नाहीत.”

या मागणीसाठी कॉ. सुरज जककुलवार (जिल्हा सदस्य), कॉ. सततु हेडो, कॉ. रमेश कवडो व बाजू तुमरेटी यांच्यासह भाकपा पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांनी सक्रिय पाठपुरावा केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here