
मा.राधेश्याम बरय्या यांचे आव्हान
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – वडसा : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटविणाऱ्या निवडक स्त्री कलावंतांचा सत्कार सोहळा वडसा येथे होणार आहे.महिला कलावंतांच्या सत्कार सोहळ्याच्या आयोजनाबाबत नियोजन बैठक नुकतीच संपन्न झाली.लवकरच सात जूनला आयोजित करण्यात येणाऱ्या या सत्कार सोहळ्यात नृत्य, नाट्य, संगीत,कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला कलावंतांचा सन्मान करण्यात येणार आहे.महिला कलावंतांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या कलागुणांचे समाजासमोर गौरव करणे हा उद्देश असल्याचे आयोजक राधेश्याम बरय्या यांनी सांगितले.
महिला कलावंतांच्या कला, संस्कृती व सामाजिक योगदानाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या “महिला कलावंत सत्कार सोहळ्याचे भव्य आयोजन देसाईगंज वडसा येथील नगरपरिषदेच्या सभागृहात करण्यात येणार आहे. या सत्कार सोहळ्यासाठी माजी मंत्री डॉ.आ. धर्मरावबाबा आत्राम, गडचिरोली जिल्ह्याचे सह पालकमंत्री मा.आशिष जयस्वाल, भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह नाट्य क्षेत्रातील दिग्गज मान्यवराच्या प्रमुख उपस्थितीत रंगभूमीवर कार्य करणाऱ्या महिला कलावंतांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव राधेश्याम बरय्या यांनी दिली.















