prabodhini news logo
Home गडचिरोली गडचिरोली-उमरखेड एसटी बसचा भीषण अपघात; २ प्रवाशांचा मृत्यू, ३३ प्रवासी जखमी

गडचिरोली-उमरखेड एसटी बसचा भीषण अपघात; २ प्रवाशांचा मृत्यू, ३३ प्रवासी जखमी

0
58

गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – गडचिरोलीहून उमरखेडच्या दिशेने निघालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) एसटी बसचा आज, गुरुवार, २१ मे २०२६ रोजी सकाळी ७:१५ वाजता नवेगाव (मुरखळा) गावाजवळ भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेचा लोखंडी कठडा तोडून खाली कोसळली. या दुर्दैवी अपघातात २ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून ३३ प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघात कसा घडला?
गडचिरोली डेपोतून बस (क्रमांक MH.14 BT -0740) सकाळी नेहमीप्रमाणे प्रवाशांना घेऊन उमरखेडकडे निघाली होती. बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. बस नवेगाव (मुरखळा) परिसरात पोहोचताच चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या खाली उलटली. या भीषण अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

मृत आणि जखमींची माहिती
या अपघातात ख्वाजा शाहबूद (वय ७०) आणि लक्ष्मीबाई रामदास दुर्कीवार (वय ६०, रा. नवरगाव, ता. सिंदेवाही) या दोन प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याशिवाय ३३ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णवाहिकेने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. जखमींमध्ये ७ महिन्यांचा चिमुकला शिवांश स्वप्नील नवघरे याचा समावेश असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. एका तरुणीची प्रकृतीही गंभीर असून, तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
मदत व बचाव कार्य
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि प्रशासकीय पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून त्यांना रुग्णालयात पोहोचवण्यात आले. पोलीस या अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास करत आहेत.

जखमींची यादी:
अपघातात धनश्री ललित चांदेकर, आशिष संघपाल साखरकर, मायाबाई बाबुराव कांबळे, संगीता बाबुराव कांबळे, ज्योती अविनाश पाल, श्रीहरी खडकर, बेबीबाई श्रीहरी खळकर, चैतन्य मारुती मेडीवार, तानिया मारुती मेडीवार, वैशाली मारुती मेडीवार, रूपाली खनके, ललिता यशवंत खणके, ऋषभ निळकंठ खडके, सचिन शामराव वाळके, जयश्री सचिन वरभे, सचिन शामराव वरदे, जयश्री खाणके, रत्नाकर दादाजी राऊत, पार्थ गणेश राऊत, मंगला संजय कळसकर, भूषण नरेश दुर्कीवार, चालक रोहित देशमुख, वाहक संदीप प्रल्हाद पवार, विकी सुरेश शेंडे, तारा साबळे, श्वेता स्वप्निल नवघडे, डॉ. गणेश जैन, सुमन नामदेव कत्तलवार, व्यंकट नरेश ढगे, अश्विनी लक्ष्मण तोरपे, किशोर कुमाजी गावतुरे आणि गौरव यशवंतराव कुमरे हे जखमी झाले आहेत.
@#

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here