
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – 24 मे रोजी सावित्रीबाई फुले महिला बहुउद्देशी विकास संस्था वालई कारंजा लाड व स्त्री शक्ती मंच संघटना कारंजा लाड जिल्हा वाशिम तर्फे शेतकरी भवन मंगरूळपीर रोड कारंजा लाड येथे भव्य दिव्य राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळा नियोजनबद्ध आयोजित केला होता संस्थेचे अध्यक्ष शारदा अतुल भय्यार सचिव सो माधुरी विवेकानंद वार्डेकर यांनी आपला कारंजा लाड येथे महिला संस्थेतर्फे प्रथमच कारंजा शहरात भव्यदिव्य राजश्री पुरस्कार सन्मान सोहळा आयोजित केला होता.

या कार्यक्रमाला आमदार सई प्रकाश डहाके कारंजा मानोरा न्यायाधीश डॉक्टर संतोष कुमार जयस्वाल प्रसिद्ध साहित्यिक पुष्पराज गावंडे सर सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर किरण खेडकर सर नागपूर प्रसिद्ध गझलकार चंद्रशेखर बिहार अकोला राष्ट्रीय प्रशिक्षक पुंडलिक गोसावी सर अमरावती पत्रकार संजय कर्बोले सर संस्थापक एकनाथ पवार पोलीस निरीक्षक शुक्लासर पोलीस वसंतराव ठाकरे पोलीस पौर्णिमा मोठे कारंजा सर्वांच्या उपस्थित पुरस्कार सन्मान सोहळा धुमधडाक्यात साजरा करण्यात आला हे विशेष प्रस्ताविक संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष असो शारदा अतुल भुयार यांनी केले राष्ट्रीय प्रशिक्षक पुंडलिक गोसावी अमरावती यांनी आपले मनोगत व्यक्त केले संस्थेचे कार्य अप्रतिम असे म्हणून संस्थेचा गौरव केला एकनाथ पवार सरने आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे नियोजन करताना किती बारीक बारीक गोष्टी कराव्या लागतात किती संघर्ष करावा लागतो सोप नाही एवढं मोठं भव्यदिवे नियोजन करणे हे भुयार मॅडम करून दाखवलं एक स्त्री हे करू शकते हे त्यांनी सांगितलं. माधुरी वार्डेकर, प्राध्यापक उमाकांत बोबडे यांनी या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन केलं, व या सर्व कार्यक्रमाचे आयोजन नियोजन शारदा भुयार यांनी केले होते,















