
प्रज्ञा निमगडे
जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
आरमोरी तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वैनगंगा नदीच्या पुलावरून एका तरुण महिला पोलीस शिपयाने नदीत उडी मारली. सदर घटना दुपारी चार वाजता ३०-जून ला घडली शारदा नामदेव खोब्रागडे वय ३० वर्षे असे नदीमध्ये उडी मारलेल्या महिला पोलीस शिपायाचे नाव आहे. महिला पोलीस शिपाई मूळच्या चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाडी तालुक्यातील शिवनी गावची रहिवासी आहे.
http://www.prabodhininews.com/?p=26198
सध्या ती गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलीस स्टेशनला कार्यरत आहे. शारदा खोब्रागडे महिला पोलीस आपली दुचाकी वाहन पुलावर उभी केली आणि मोबाईल सुद्धा पुलावर ठेवला आणि नदीमध्ये उडी मारली हा प्रकार काही लोकांच्या लक्षात येताच लोकांनी आरमोरी पोलिसांना याची माहिती दिली लगेचच आरमोरी पोलिसांनी नदिकडे धाव घेऊन सोबतच तहसील कार्यालयाच्या बचाव पत्तकाला पाचारण केले आणि सायंकाळपर्यंत शोध मोहीम राबवली असता तिच्या थांग पत्ता लागलेला नाही.
http://www.prabodhininews.com/?p=26188
यावेळी वैनगंगा फुलावरती लोकांची खूप गर्दी जमलेली होती नदीच्या पात्रात पाण्याची वाढ झाल्याने शारदा खोबऱ्याकडे पाण्याच्या प्रवाहात वाहून तर गेली नसावी अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. असे समजते शारदा खोब्रागडे या अविवाहित असल्याचे समजते त्यांनी अशा पद्धतीने आपली जीवन यात्रा संपवण्याचा मार्ग पत्करणे यामागे नेमके कोणते कारण असावे हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
http://www.prabodhininews.com/?p=26202
http://www.prabodhininews.com/?p=26194
http://www.prabodhininews.com/?p=26206
http://www.prabodhininews.com/?p=26242














