
भंडारा जिल्हा प्रतिनिधी
नरेश गजभिये लाखांदूर
प्रबोधिनी न्यूज चॅनल
जि. प. उच्च प्राथमिक शाळा दवडीपार /बेला येथे “शाळा पूर्व तयारी अभियान” मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष शालु राखडे यांचे अध्यक्षतेखाली ग्राम पंचायत सदस्या रीना खंगार यांचे शुभ हस्ते पद्मा मते, मुख्याध्यापक दशरथ जिभकाटे, प. शि. ज्ञानेश्वर राऊत, स. शि. अरविंद बारई, आदि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न करण्यात आला.
या मेळाव्यात 7 टेबलवर विद्यार्थ्यांच्या कृती घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स. शि. अरविंद बारई तर आभार प. शि. ज्ञानेश्वर राऊत यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मीना सेलोकर, निधी राखडे, माहेश्वरी वाट, सोनू पगाडे, नैतिक राखडे, साहिल राखडे, भावेश कुथे, भावेश भोयर, वैभव खंगार यांनी परिश्रम घेतले.














