prabodhini news logo
Home ठळक बातम्या गुंथारा येथे शाळापूर्व तयारी मेळावा क्रं 2 चे आयोजन

गुंथारा येथे शाळापूर्व तयारी मेळावा क्रं 2 चे आयोजन

0
64

भंडारा जिल्हा प्रतिनिधी
नरेश गजभिये लाखांदूर
प्रबोधिनी न्युज

आज दिनांक 3/7/2023 रोज सोमवार ला सकाळी 8.00 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे गुरुपौर्णिमा (व्यास पूजा) व शाळा पूर्व तयारी मेळावा क्रं 2 चे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. शामभाऊ सार्वे,उपाध्यक्ष मा.भारत गोमासे, उपसरपंच मा मंजुषा ताई जगनाडे,ग्राम पंचायत सदस्य मा.दिलीपजी कायते, शा. व्य.समिती सदस्य मा.नागेश्वरजी ठवकर,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मा.राजुभाऊ सूर्यवंशी, गावचे पोलिस पाटील मा.नरेंद्रजी सार्वे शाळेचे मुख्याध्यापक मा.ईश्वर निकुडे प्रामुख्याने उपस्थित होते. महोदयांच्या हस्ते मेळाव्याचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. व माता पालकांना मार्गदर्शन करून 7 टेबल वर विविध कृती करून घेण्यात आल्या. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी शाळेचे शिक्षक श्री सोपचंद सिरसाम सर, बोरवार मॅडम, धूर्वे मॅडम, अंगणवाडी कार्यकर्त्या मंगलाताई जगनाडे, शामकलाताई सार्वे, शालुबाई मुटकुरे शालेय पोषण आहार मदतनीस सुनिताबाई , रंजनाबाई या सर्वांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here