
नागभीड प्रतिनिधि
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
नागभीड तालुक्यातील नांदेड येथील एनतबी मरह्रुम जलील शेख यांच्या मुलीचा लग्न जुळला आहे परंतु त्यांची परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्याने लग्नाचा खर्च त्यांच्याने झेपनार नव्हता,याची माहीती काँग्रेस कार्यकर्त्यांनी चिमूर विधानसभा क्षेत्राचे युवा काँग्रेस नेते तसेच गोर-गरीब जनतेचे कैवारी श्री.दिवाकरभाऊ निकुरे यांना कळवली व भाऊंनी याची तात्काळ दखल घेत कार्यकर्त्यांना मार्फत त्यांच्या लग्नकार्याकरीता आर्थिक मदत पाठविली.
यावेळेस जिल्हा युवक काँग्रेस महासचिव सागर खोब्रागडे,नांदेड येथील काँग्रेस कार्यकर्ते फिरोज पठाण,नांदेल जामा मस्जिद अध्यक्ष अलिफ़ शेख,तं.मु.अध्यक्ष चाँद खाँ पठाण,हाफीज साहब,सरवर आलम,तरबेज आलम आदी उपस्थित होते.














