
रविंद्र मैंद
शहर प्रतिनिधी, ब्रम्हपुरी
प्रबोधिनी न्युज
३ जुलै सोमवार रोजी ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्यावतीने ब्रह्मपुरी जिल्हा झालाच पाहिजे तसेच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय चिमूरला न देता ते ब्रह्मपुरी ला द्यावे या प्रमुख मागणीसाठी ब्रह्मपुरी कडकडीत बंद पाडून धरणे आंदोलन करण्यात आले.

समितीच्या कार्यकर्त्यांनी सकाळी बाईक रॅली काढून शाळा, कॉलेज ,मार्केटमध्ये जाऊन व्यवस्थापन बंद करण्याची आग्रहाची विनंती केली याला ब्रह्मपुरी करांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. यादरम्यान पोलिसांच्या चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी आपले जिल्हा निर्मितीवर विचार व्यक्त केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी प्राचार्य डॉ. कोकोडे सर, तर या तर याप्रसंगी ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्राध्यापक अतुल देशकर, एडवोकेट गोविंद भेंडारकर,प्रा. देविदास जगनाडे, नानाजी तुपट, न.प. ब्रह्मपुरीचे उपाध्यक्ष अशोक रामटेके, संतोष रामटेके, डॉ. प्रेमलाल मेश्राम, सुधा राऊत प्रा. मंजुषा बजाज प्रा.राजकुमार शेंडे, डॉ. राखडे, इकबाल जेसानी अध्यक्ष व्यापारी संघटना, विलास विखार नगरपरिषद बांधकाम सभापती, अविनाश राऊत, प्रशांत डांगे एडवोकेट आशिष गोंडाने या सर्व मान्यवरांनी ब्रह्मपुरी जिल्हा संबंधाने आपले विचार व्यक्त केले या धरणे आंदोलनाचे प्रास्ताविक विनोद झोडगे, संचालन राजू भागवत तर आभार प्रदर्शन सुनिल विखार यांनी केले या आंदोलनाकरिता ब्रह्मपुरीकर मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.














