
संकेत प . बागरेचा
धुळे तालुका प्रतिनिधी
धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघ चे वतीने निवेदन देण्यात आले आहे. बुलढाणा ते पुणे या ट्रॅव्हल्स लक्झरी बस मध्ये आग लागून अपघात मध्ये अनेक प्रवाशी यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या ट्रॅव्हल लक्झरी बस मध्ये कुठलीही सुविधा नाही. आग लागली तर फायर एक झिट गेशन नाही अपघात कालीन दरवाजा नाही प्रवाशी यांच्या कडून भाडे लगेच तेवढे घेतात परंतु कुठलीच सुविधा नाही म्हणून त्यांना ताकीद आणि सूचना करावी अशी मागणी निवेदनात केली आहे आणि प्रशासना कडून मयत प्रवाशी यांच्या नातेवाईक यांना आर्थिक मदत लवकर मिळावी आणि मयत प्रवासी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी धुळे, आरटीओ धुळे, एसपी धुळे यांना निवेदन देताना धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघ चे धुळे जिल्हा अध्यक्ष जगन बापूसाहेब ताकटे युवक धुळे जिल्हा अध्यक्ष विक्रमसिंह काळे धुळे जिल्हा संघटक बाजीराव भाऊ खैरनार ज्येष्ठ सल्लागार साहेबराव पाटील धुळे जिल्हा उपाध्यक्ष राजन बागल धुळे जिल्हा खजिनदार राजेंद्र मराठे, संजय पाटील सरपंच साक्री चंद्रकांत पाटील साक्री जनता महाविद्यालय चेअरमन संजय आबा नेतकर, रमेश मराठे, कांतीलाल देवरे, वैभव पाटील, मिलिंद पाटील, गणेश मराठे, हरिश्चंद्र मिसाळ, विनोद पाटील यांनी निवेदनावर सही केली आहे.














