prabodhini news logo
Home ठळक बातम्या एसआरपी जवानाने केली चाकू भोसकून हत्या

एसआरपी जवानाने केली चाकू भोसकून हत्या

0
49

प्रज्ञा निमगडे
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली

गडचिरोली – राखीव बलाच्या जवानाने शेजारी राहणाऱ्या सहकाऱ्याची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री 11 वाजता च्या सुमारास देसाईगंज तालुक्यातील विसोरा येथे घडली.
http://www.prabodhininews.com/?p=26403
सुरेश मोतीलाल राठोड (30) असे मृत जवानाचे तर मारोती संभाजी सातपुते (33) असे आरोपी जवानाचे नाव आहे. दोघेही यवतमाळ जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. देसाईगंज शहरा नजिकच्या विसोरा येथे राज्य राखीव बल गट क्रमांक 13 चे मुख्यालय आहे.तेथील कर्मचाऱ्याच्या वसाहतीत सुरेश राठोड आणि मारोती सातपुते शेजारी वास्तव्य करत होते. परंतु मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरु होता. सोमवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास दोघांमध्ये कडाड्याचे भांडण झाले. अशातच मारोती सातपुते याने घरातून चाकू आणून सुरेश वर वार केले. यात सुरेश चा मृत्यू झाला.या घटनेमुळे राज्य राखीव बलामध्ये मोठी खळबळ माजली आहे. याप्रकरणी देसाईगंज पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली आहे..
http://www.prabodhininews.com/?p=26393
न्यायालयाने 6 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलीस उपनिरीक्षक युनूस इनामदार घटनेचा तपास करित आहेत.

http://www.prabodhininews.com/?p=26399

http://www.prabodhininews.com/?p=26396

http://www.prabodhininews.com/?p=26391

http://www.prabodhininews.com/?p=26388

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here