prabodhini news logo
Home ठळक बातम्या श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज श्री. शिवाजीनगर येथे विद्यार्थीनीची छेडछाड.

श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज श्री. शिवाजीनगर येथे विद्यार्थीनीची छेडछाड.

0
50

जालिंदर आल्हाट
ब्युरो चीफ
प्रबोधिनी न्यूज अहमदनगर

राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनींना एका परगावच्या पुरूषाने छेडछाड केल्याची घटना घडली. याबाबत प्राचार्य संसारे यांनी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना पत्र पाठवून सदर छेडछाड करणाऱ्या पुरुषांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
छत्रपती शिवाजी हायस्कुलची जेवणाची सुट्टी दुपारी १.३० वा. होत असते. आज ४ जुलै २०२३ रोजी नेहमीप्रमाणे विद्यालयाची जेवणाची सुट्टी झाली असता विद्यालयातील ४ विद्यार्थीनी विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे गेल्या होत्या. यावेळी अज्ञात २५ ते ३० वयोगटाच्या एका पुरुषाने या विद्यार्थिनींना विविध प्रकारचे हावभाव करुन छेडले. सदर घटना या विद्यार्थीनींनी विद्यालयाचे सेवक भाऊसाहेब पगारे यांना सांगितली असता श्री.पगारे यांनी सदर पुरुषाला विद्यालयांत पकडून आणले. यावेळी त्याच्यामागे काही महिला व एक वृद्ध पुरुष देखील विद्यालयामध्ये आले. आम्ही मढीवरुन दिंडोरीकडे चाललो आहोत, अशी बतावणी सदर नागरिकांनी केली व इतर शिक्षक कर्मचारी येईपर्यंत त्यांनी विद्यालयातून पळ काढला. काहींनी त्यांचा पाठलाग केला परंतु त्यांनी धूम ठोकली.

स्थानिक नागरिकांच्या सांगण्यानुसार सदर पुरुष व त्याच्याबरोबरचे लोक एर्टिगा या पांढ-या रंगाच्या वाहनामधून आले होते आणि सदर गाडी ही कोल्हारच्या दिशेने गेली.

याबाबत प्राचार्य संसारे यांनी पोलीस निरीक्षक जाधव यांना रीतसर तक्रार दिली असून पोलीस खात्यामार्फत सदर छेड करणा-या पुरुषावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

खालील संदेश सोशल मीडियावर पालकांपर्यंत जात आहे

श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज श्री. शिवाजीनगर या विद्यालयांमध्ये आपले मुलं पाचवी ते बारावी पर्यंत शिकतात आज जो प्रकार घडला त्यावेळी शिक्षकांनी हस्तक्षेप करायला हवा होता परंतु एकही शिक्षक धावून आला नाही तेथे भाऊसाहेब पगारे नसते तर बाहेरगावचे काही टार्गेट मुलांनी मुलींची छेड काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्या मुलींनी भाऊसाहेब पगारे यांना सांगितल्यामुळे तेथे गेले व त्या मुलांना फटके देऊन ऑफिसमध्ये आणलं परंतु शिक्षक व मुख्याध्यापकांनी त्यांना सोडून दिलं हा प्रकार निंदनीय आहे म्हणून आपण सर्वांनी एकत्र यावे व सर्व शिक्षकांना जाब विचाराव नाहीतर आपल्या मुला-मुलींना कोणते ते संरक्षण देणार व कोण त्यांचा लक्ष देणार हा विषय महत्त्वाचा आहे म्हणून आपण सर्वांनी सकाळी साडेदहा वाजता विद्यालयाच्या जवळ यावे अशी मी सर्वांना विनंती करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here