prabodhini news logo
Home ठळक बातम्या सिंदेवाही येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयामधे महिलांची गर्दी

सिंदेवाही येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयामधे महिलांची गर्दी

0
47

कपिल एस. मेश्राम
ता. प्रतिनिधि
सिंदेवाही

सिंदेवाही एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय येथील तालुक्यात अंगणवाडी मदतनीस या पदाच्या जागा भरण्यासाठी अर्ज घेणे सुरू असून अर्ज करण्याची ६ जुलै ही शेवटची तारीख आहे.

सिंदेवाही तालुक्यात ग्रामीण भागात १६२ अंगणवाडी केंद्र व मिनी अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. तालुक्यातील ५१ जागेवर मदतनीस या पदासाठी अर्ज सुरू आहे. अर्ज करण्यासाठी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय सिंदेवाही येथे महिलांची अर्ज करण्यासाठी धडपड सुरू आहे.आणि बालविकास प्रकल्प कार्यालयावर तोबा गर्दी उसळलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here