prabodhini news logo
Home ठळक बातम्या इतर मागास, भटके विमुक्त, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करावी-...

इतर मागास, भटके विमुक्त, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करावी- माजी पालकमंत्री तथा स्थानिक आमदार विजय वडेट्टीवार यांना निवेदन.

0
51

रविंद्र मैंद
ब्रह्मपुरी शहर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

महाराष्ट्रात दहावी, बारावीचे निकाल घोषित होऊन जवळपास एक महिना उलटला आहे इतर अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्याप्रमाणे ग्रामीण भागातील इतर मागास, भटके विमुक्त , विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा उच्च शिक्षणासाठी शहराच्या ठिकाणी यावे लागते. परंतु शहरात वास्तव्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना हलाखीचा सामना करावा लागतो आणि अनेक विद्यार्थी गरिबीमुळे शहरात येऊच शकत नाही यास्तव इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात.
अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहे स्वाधार तथा स्वयंव योजनेसाठी अर्ज करणे सुरू होऊन पंधरा दिवस झालेले आहेत परंतु आत्तापर्यंत इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे वस्तीगृह तथा स्वाधार योजना सुरू झालेली नाही. महाराष्ट्रात एकाही जिल्ह्यात आतापर्यंत खाजगी इमारत अधिग्रहित केली गेली नाही आणि स्वाधार योजना अजूनही मंत्री मंडळासमोर आलेली नाही.या सर्व बाबींचा विचार केल्यास असे कळते की शासन फक्त घोषणा करण्यात समोर आहे परंतु इतर मार्गास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासन उदासीन आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग, भटके विमुक्त, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसोबत खेळ आहे.
मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार भारतात प्रत्येक जिल्ह्यात एक वस्तीगृह असायला पाहिजे परंतु आज 42 वर्षानंतर सुद्धा इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे. 52% इतर मागास प्रवर्ग, भटके विमुक्त आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी युवकांना न्याय मिळत नाही ही महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्यात अशोभनीय आहे.
आपल्याप्रति आमचे प्रेम आहे आणि आपणच आमचे कर्तेधर्ते आहात म्हणून आम्ही तुम्हाला वरील विषयासंबंधी विनंती करत आहोत. आपण आपली जबाबदारी पार पाडून आम्हाला उपकृत करावे. आपण आमच्या विनंतीला मान देऊन इतर मागास प्रवर्ग ,भटके विमुक्त, विशेष मागास प्रवर्गातील वस्तीगृहातील 7200 व स्वाधार योजनेतील 21 हजार 600 असे पूर्ण 28 हजार 800 विद्यार्थ्यांना न्याय दावा या अनुषंगाने आमदार तथा माजी पालक मंत्री चंद्रपूर जिल्हा यांना ओबीसी कार्यकर्त्यामार्फत निवेदन देण्यात आले निवेदन देते वेळी भाऊरावजी राऊत सर ओबीसी विचारवंत ब्रह्मपुरी, जगदीश पिलारे,सुरज तलमले, स्वप्निल राऊत ,वैभव तलमले, निहाल ढोरे,विकास चौधरी ,राजेश माटे व इतर ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here