
रविंद्र मैंद
ब्रह्मपुरी शहर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
ब्रह्मपुरी शहरातील गुजरी वॉर्ड येथील रहिवासी कपिल खुशाल भैसारे वय 22 वर्ष , मुन्ना राऊत वय 45 वर्ष, रोहित भैसारे वय 32 वर्ष , तिघेही गुजरी वॉर्ड चौकात बसून आपापसात चर्चा करीत होते या चर्चेचे रूपांतर भांडणात झाले या वादावादीत मुन्ना राऊत यांनी कपिल भैसारे यांच्यावर चाकूने वार केला व तिथून पळून गेला काही वेळा नंतर कपिल भैसारे यांच्या भाऊ फिरायला बाहेर आला असता कपिल हा रक्ताच्या थारोड्यात पडून दिसला त्याने गंभीर जखमी अवस्थेत कपिलला ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
http://www.prabodhininews.com/?p=26477
सदर प्रकरणात दोन्ही आरोपींना ब्रह्मपुरी पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे करीत आहेत.
http://www.prabodhininews.com/?p=26466
http://www.prabodhininews.com/?p=26470
http://www.prabodhininews.com/?p=26473
http://www.prabodhininews.com/?p=26481
http://www.prabodhininews.com/?p=26433














