prabodhini news logo
Home ठळक बातम्या टोकरे कोळी युवा मंचतर्फे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन, समाज बांधवांनी व विद्यार्थी मोठ्या...

टोकरे कोळी युवा मंचतर्फे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन, समाज बांधवांनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती राहवे:- विजय कोळी

0
84

संकेत प. बागरेचा
धुळे तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क

नेर – शहादा येथे सालाबाद प्रमाणेच या वर्षी म्हणजे 16 जुलै 2023 रविवार रोजी सकाळी 10 वाजता टोकरे कोळी युवा मंच महाराष्ट्र् राज्यच्या वतीने 10 वि , 12 वि , पंधविधर उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थी व विध्यार्थीनींना सन्मानित करण्यात येणार आहे. टोकरे कोळी युवा मंच ही एक सामाजिक संस्था असून नितीन भाऊ कोळी व त्यांचे सहकारी मित्र व कार्यकर्ते सोबत मिळून विविध सामाजिक कार्यक्रम राबवित असतात.शालेय विद्यार्थीं मित्रांना व्यासपीठ देऊन व त्यांना सन्मान देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा एक छान असा प्रयत्न टोकरे कोळी युवा मंच च्या माध्यमातून होत असतो. प्रत्यक वर्षी गुणगौरव सोहळा कार्यक्रम राबवून समाजाला संघटित करण्याचं उत्तम कार्य या संस्थेच्या माध्यमातून होत असत. दर वर्षी 200 हुन अधिक विध्यार्थी व विध्यार्थीनींना गौरविण्यात येत आहे.
या वर्षी देखील एक आगळा वेगळा स्टेज कार्यक्रम राबविण्याचा निर्णय टोकरे कोळी युवा मंच ने घेतलेला असून मी विजय कोळी समस्त समाज बांधवांना , सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या युवा कार्यकर्त्यांना व महिला बगिनींना आव्हान करतो की , ज्या प्रमाणे दर वर्षी आपण मोठ्या संख्येने उपस्थिती देत असतात, त्याच प्रमाणे 16 जुलै 2023 रविवार रोजी सकाळी 10 वाजता होणाऱ्या गुणगौरव सोहळ्यात प्रत्यक्ष उपस्थिती देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवा.

कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यात ज्या कार्यकर्त्यांची मेहनत दर वर्षी लाभते , या वर्षी देखील आपण सर्वांनी मिळून टोकरे कोळी युवा मंच तर्फे राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाला यश प्राप्त करून घ्यावे अशी आपणास नम्र विनंती आहे.
तसेच ज्या विध्यार्थी मित्रांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार होणार आहे अश्या विध्यार्थी मित्रांनी आपल्या पालकांना सोबत आणावे असे आवाहन विजय कोळी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here