
शैलिका सागवरे
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
जिवती तालुक्यातील दोन दलात तरुणांची हत्या प्रेम संबंधाने झालेली आहे. संतोष राजेंद्र शिंदे हा २८ मार्च २०२३ पासून बेपत्ता होता, दिनांक ३० मार्च २०२३ ला संशयीत आरोपीनेच त्याच्या घरी येऊन सांगितले. बेपत्ता मुलाची तक्रार देण्याकरीता मुलाचे आई वडील पोलीस स्टेशनला जात असताना संशयीत आरोपी विनोद हाके याने मी उद्या तुमच्या मुलाला शोधून आणतो, असे म्हणून रोखले व दुसऱ्या दिवशी त्याच संशयीत आरोपीने मयत सतीष शिंदेच्या आई वडीलाना येऊन सांगितले की, तुमच्या मुलाने तुमच्याच शेताजवळील कडुलिंबाच्या झाडाला फाशी घेतली आहे. मयताच्या आई वडीलाना तक्रार देण्यास त्यानेच रोखले व त्यानेच घरी येऊन मुलगा मयत झाल्याची व कुठे झाला याची माहिती दिली, हे संशयास्पद आहे. संशयीत आरोपीच्या बहिनीशी मयताचे प्रेमसंबंध होते. मयताची हत्या करण्याच्या आधी दोन ते तिन दिवस आरोपी त्याच्या सोबत होते व त्याची कट रचून हत्या करण्यात आलेली आहे. तसेच त्याचा पोस्ट मार्टम रिपोर्ट वैद्यकीय शाररीक अहवालात खाडतोड केलेली दिसते. त्यात कुठे डोळे उपडे, तर कुठे बंद, तर कुठे जिभ बाहेर तर कुठे जिभ बाहेर नव्हती, असे खाडतोड केलेली आढळते. तसेच आरोपी कडून मृतकाच्या कुटुंबियांना येणान्या वारंवार धमक्या यावरुन मृत्तक संतोष शिंदेची आत्महत्या नसून त्याची हत्याच आहे. हे सिध्द होते. मृतक संतोष शिंदेच्या हत्येप्रकरणी पोलीस विभागानी योग्य ती चौकशी केलेली नाही. चौकशी अधिकारी मडावी व पोलीस उपनिरीक्षक महैसेकर यांनी दिरंगाई व सि.डी. आर रिपोर्ट मध्ये खोडतोड केलेली आहे. हे स्पष्ट होते. तसेच, जिवन राजाराम तोगरे हा तरुण सामाजिक, राजकीय संघटनेत काम करीत होता. रुग्णाच्या सेवेसाठी तो प्रसिध्द होता. त्याला सा सेवक जिवन लोगो म्हणून त्याची समाजात ओळख होती. त्याचे एका तरुणीशी प्रेम संबंध होते. त्या प्रेम संबंधातूनच त्याची सुध्दा हत्या झालेली आहे. तो तरुण ज्या दिवसापासून घरून बेपत्ता होता. त्याची हत्या झाली त्याच दिवशी त्या तरुणीने जिवन तोगरे याच्या विरोधात खोटी तक्रार दिलेलो आहे. तसेच तिने दिलेली तक्रार व जिवनची हत्या ही वेळ जुळून येत आहे. तरीही पोलीस स्टेशन, पिटीगुड्डा यांनी जिवन तोगरे यांच्या हत्येची योग्य ती चौकशी केली नाही, असे निदर्शनास येते.
वरिल नमुद दोन्ही तरुण जिवती तालुक्यातील आहेत. तसेच ते दोघेही दलीत कुटुंबातून येतात आणि त्या दोघांच्याही हत्येत थोड़े बहुत साम्य आहे. दोषाचीही हत्या जिवती तालुका पोलीसांनी योग्य तो न्याय दिला नाही, असा आमचा आरोप आहे. तसेच दोघांच्याही पोस्ट मार्टम मध्ये संशय आहे. त्यामुळे वैद्यकीय अहवाल करणाच्या डॉक्टरवर ही कार्यवाही करावी व या दोन्ही दलीत तशाच्या बियांना न्याय मिळावा म्हणून आमच्या खालील प्रमाणे मागण्या आहेत. त्याकरीता आम्ही चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला बसलो आहोत.
मा. ना. सुधिर मुनगंटीवार, वने, सांस्कृतिक कार्य व वत्स्य व्यवसाय मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई, तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा मा. विजय वडेट्टीवार, माजी मंत्री म.रा. तथा आमदार, महपूरी विधानसभा क्षेत्र मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर, मा. जिल्हा पोलीस अधिक्षक, चंद्रपूर, मा.ना.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई 32 सर्वांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आले आहे.
आमच्या प्रमुख मागण्या
1) वरिल दोन्ही नमुद दलीत तरुणाच्या हत्येची सखोल चौकशी सी.बी.आय. मार्फत करण्यात यावी.
2) दोन्ही तरुणाच्या हत्येसंबंधी आरोपी वर अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हे नोंदवावे.
3) दोन्ही दलीत तरुणांच्या हत्येसंबंधी सखोल व योग्य ती चौकशी न केल्यामुळे पोलीस अधिकारी यांना सहआरोपी करून ३०२ अंतर्गत गुन्हा नोंद करावा.
4) दोन्ही दलीत तरुणाच्या हत्येसंबंधी चुकीचा वैद्यकिय अहवाल दिल्या प्रकरणी वैद्यकिय अधिकान्यावर ३०२
अंतर्गत गुन्हा नोंद करून सहआरोपी करावे.
5) दोन्ही दलांत तरुणाच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लक्ष रुपयाची शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी.
याप्रमाणे आमच्या मागण्या असून त्या मान्य न झाल्यास किंवा दलीत तरुणांच्या कुटूबियांना तात्काळ न्याय न मिळाल्यास आंदोलन पुन्हा तिव्र करण्यात येईल, याची दखल घेण्यात यावी.














