prabodhini news logo
Home ठळक बातम्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप.

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप.

0
70

किशन बी पवार
तालुका प्रतिनिधी माजलगाव
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
9421768686

माजलगाव दि.14.07.2023. माजलगाव तालुक्यातील किट्ठी आडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत माजी सरपंच बाबासाहेब नाना आगे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे यावेळी बाबासाहेब नाना आगे यांनी विद्यार्थ्यांना बोलताना म्हणाले की कुठल्याही माणसाच्या जीवनात केवळ शिक्षणच महत्त्वाचे आहे त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना शिक्षण शिकवण्यासाठी विशेष लक्ष द्यावे काही अडचण असेल तर शिक्षकांशी संवाद साधावा परिस्थितीवर मात करण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही गावातील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपापली मुले शाळेत पाठवावी शिक्षणासाठी वंचित राहू नये याप्रसंगी इतर मान्यवरांनाही मार्गदर्शन केले गावातील ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. किट्ठी आडगाव हे एक नावाजलेले गाव आहे मोठी संख्या पाठब्ल आहे किट्ठी आडगाव येथे माजी सरपंच बाबासाहेब नाना आगे यांचा शाल श्रीफळ गुच्छ देऊन हार्दिक स्वागत करण्यात आले त्यांनी मागील पाच वर्षात पूर्ण कायापालट करून गावचा विकास केला आहे किट्ठी आडगाव हे माजलगाव पासून 13 किलोमीटरवर आहे किट्ठी आडगाव येथे माजी सरपंच बाबासाहेब नाना आगे वाढदिवस केल्यामुळे त्यांनी सर्व गावकऱ्यांचे शिक्षकांचे सदस्यांचे मित्रमंडळींचे सहकाऱ्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here