prabodhini news logo
Home ठळक बातम्या मागील आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मनोरुग्ण व्यक्तीचा शोध घेऊन माणुसकी समूहाने केले...

मागील आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मनोरुग्ण व्यक्तीचा शोध घेऊन माणुसकी समूहाने केले छावणी पोलीसांच्या मदतीने नातेवाईकांकडे सुपूर्त

0
133

आबाराव खैरे
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी

वाळूज परिसरामध्ये मागील आठ दिवसांपासून एक व्यक्ती मनोरुग्न अवस्थेत भटकत असताना माणुसकी समुहा च्या प्रकाश जाधव यांना दिसला. त्यांनी समाजसेवक सुमित पंडित यांना संपर्क करून बोलून घेतले .सदरील मनोरुग्ण इसमाची चौकशी केला असता त्याचे आडनाव दुधे असून तो डोंगरगाव येथील रहिवासी आहे,अशी माहिती मिळाली.माणुसकी समूहाने शासकीय १०८ ॲम्बुलन्स बोलून सदरील मनोरुग्णास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल केले. त्यानंतर माणुसकी समूहा च्या सुमित पंडित यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम मेहत्रे यांना याबाबत माहिती दिली. सिल्लोड पोलीस स्टेशन मार्फत या मनोरुग्णाच्या नातेवाईकांचा लगेच शोध घेण्यात आला. या आधी हा व्यक्ती हरवल्याची तक्रार छावणी पोलीस स्टेशन येथे आल्याचे छावणी स्टेशनचे पोलीस निरीक्षक देशमाने साहेब यांनी कळविले होते. माणुसकी समूहाच्या सदस्यांमुळे या हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला योग्य औषध उपचार करून छावणी पोलीस्टेश येथे हजर करुन त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. यासाठी सिल्लोड वरिष्ठ पोलीस निरीक्षण सिताराम मेहेत्रे ,छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास देशमाने,सहाय्यक पोलीस निरीक्षक भागिले,उप पोलीस निरीक्षण डाके, पोलीस हवालदार दिलीप जाधव, भोज,मंगेश शिंदे आणि माणुसकी समूहाचे प्रकाश जाधव,सुमित पंडीत,सदाशिव फुले,पुजा पंडित, डाँ. रंजना दंदे,यांनी महत्त्वाचे सहकार्य केले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here