
प्रेरणा निमसटकर
चंद्रपूर विशेष जिल्हा प्रतनिधी
चंद्रपूर आज दिनांक १५/७/२०२३ रोजी सावित्रीबाई फुले शाळा सी एम सी बाबुपेठ चंद्रपूर, सिटी माध्यमिक विद्यालय बाबुपेठ चंद्रपूर आणि स्व.रीता आत्रम उच्च प्रा.विद्यालय बाबुपेठ चंद्रपूर या शाळांमधे माणुसकी ग्रुप चंद्रपूर तर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले शाळेचे मुख्याध्यापक नागेश नीत, प्राध्यापक अनंत मल्लेलवार सर सामाजिक कार्यकर्ता जावेद शेख, नेत्रा इंगुलवार भास्कर कलवल, चंदा वैरागडे इत्यादी मान्यवर लाभले.

सावित्रीबाई फुले शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि उपस्थित पालक परिसरातील नागरिक यांना प्रा. मल्लेलवार सरांनी वृक्ष्यारोपानाचे महत्त्व सांगून योग्य प्रबोधन केले. जेणे करून विद्यार्थ्यांना लहान वयातच पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी तसेच मानवी आणि पशू जीवन वाचविण्यासाठी वृक्ष्यांरोपणाचे फार महत्त्व आहे याचे मार्गदर्शन मिळावे.
माणुसकी ग्रुप च्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम नियोजित वेळी यशस्वी पार पडला.
या वेळी माणुसकी ग्रूप चे सदस्य स्नेहा पुडके, जस्मिन शेख, विनोद पेनलीवार, विशाल रामगीरवार, सारिका टेंबरे, सुशांत धकाते, सागर ढोरेकर, रुपा कातकर, राजू कुडे, प्रदीप पटले आणि सूरज बिट्टे, उपस्थित होते.














