prabodhini news logo
Home ठळक बातम्या पुरुषोत्तम मंदिराकडे जाण्याचा रस्तावर जागोजागी खड्डे

पुरुषोत्तम मंदिराकडे जाण्याचा रस्तावर जागोजागी खड्डे

0
65

किशन बी पवार
तालुका प्रतिनिधी माजलगाव
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
9421768686

माजलगाव दि.15.07.2023. माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी हे गाव येथे पुरातन पुरुषोत्तमाचे मंदिर आहे गेली 700 वर्षी पूर्वी गोदाकाठी पुरुषोत्तमाचे मंदिर आहे परंतु जाण्या येण्यासाठी रस्त्याची दुरवस्था झाली आहे धोंड्याचा महिना हा दर तीन वर्षांनी येतो येथे लाखो भाविकांची गर्दी होते व लाखो लोक देणगी स्वरूपात देणगी देतात परंतु रस्त्याची दुर्दशा झाली आहे. तीन वर्षांनी येणार अधिक मास महिना येत्या 18 जुलैपासून सुरू होत आहे या महिन्यात पुरुषोत्तम पुरी येथील पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात मासारंभ आठ दिवसावर ठेपला असून प्रशासनाकडून अद्या प कसल्याच प्रकारची तयारी झालेली नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय आवस्था झाली आसून रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत अधिक मासात पावसाचे दिवस असल्यामुळे मंदिर ट्रस्टच्या वतीने गोदावरी पात्रापासून मंदिरापर्यंत साफसफाई चे काम सुरू आहे सावरगाव किट्ठी आडगाव पुरुषोत्तम पुरी रस्ता दुरुस्तीसाठी आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना भेटलो आहोत परंतु अद्याप रस्ता दुरुस्त झाला नसल्याने भाविकांना अडचण येणार आहे. सुनील केंद्रे कर साहेबांनी लाखो रुपयाची देणगी देऊन सुद्धा रस्ता झालेला नाही बजेट आलेले असताना पण रस्ता झाला नाही पुरुषोत्तम मंदिरासाठी दर्शनास येणारे भाविक भक्त कुणी धोंडा म्हणून वाहतात तर कुणी सोनं म्हणून वाहतात काही लोक व देणगी स्वरूपात पैसे टाकतात लाखो रुपयांची देणगी असताना आठ दिवसांमध्ये रस्ता काय होईल अशी चिंता गावकऱ्यांना पडली आहे योग्य वेळी प्रशासनाने लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा अध्यक्ष विजय गोळेकर.अशोक माने .धर्मा मोरे. अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here