prabodhini news logo
Home ठळक बातम्या गुंजेवाही येथील राहुल जेंगठे बनला राज्य कर सहायक

गुंजेवाही येथील राहुल जेंगठे बनला राज्य कर सहायक

0
68

कपिल एस. मेश्राम
ता. प्रतिनिधि
सिंदेवाही

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहीर झालेल्या निकालात राज्यकर सहायकपदी राज्यात प्रथम येत राहुल विजय जेंगठे याने उंच भरारी घेतलीआहे.

राहुल विजय जेंगठे हा सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही (कोठा) येथील सर्वसामान्य शेतमजूर कुटुंबातील आहे. हलाखीची परिस्थिती असतानाही त्याने कठोर परिश्रम घेत प्रशासनातील कठीण अशा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत झालेल्या परीक्षेत राज्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला. त्याने जळगाव येथील दीपस्तंभ फाउंडेशनच्या गुरुकुल प्रकल्पाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. अखेर त्याच्या परिश्रम,मेहनत फळाला आली. त्यांचे गावातील मित्र -मंडळ,लोकांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here