
श्रीकांत राजपंगे
तालुका प्रतिनिधी
जीवती
स्वराज्य प्रतिष्ठान हिंदुस्थान चंद्रपूर जिल्ह्याची महत्वपूर्ण बैठक दिनांक १६ जुलै २०२३, रोज रविवार ला चंद्रपूर येथील सांस्कृतिक सभागृहात पार पाडून त्यात चंद्रपूर जिल्ह्याची नूतन कार्यकारीणी घोषित करण्यात आली तसेच चंद्रपूर शहराच्या काही प्रमुख नियुक्त्या सुद्धा करण्यात आल्या. स्वराज्य प्रतिष्ठान हिंदुस्थान ही महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षा पासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात नूतन जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निशिकांत उमेश आष्टनकर यांनी मार्गदर्शन केले व यांच्या उपस्थितीत कार्यकारीणी ची घोषणा करण्यात आली.
चंद्रपूर शहर प्रमुख म्हणून करीना बोपचे तर शहर युवती प्रमुख म्हणून सानिका अलगुणवार तसेच जिल्हा कार्यकारिणी मध्ये महाविद्यालय प्रमुख रोशन आस्टूनकर, महाविद्यालय सहप्रमुख वैष्णवी गावंडे, सोशल मीडिया प्रमुख वैष्णवी मत्ते, संपर्क प्रमुख अंकित पांडे, कलामंच प्रमुख प्रगती वाभिटकर, कलामंच सहप्रमुख प्रणाली तुमसरे, पर्यावरण प्रमुख अभिषेक गुज्जनवार, सूचना व क्रीडा प्रमुख नेहाल कोल्हे, मिडिया प्रमुख श्रीकांत राजपंगे आणि व्यवस्था प्रमुख शुभम सिकदर यांची घोषणा करण्यात आली. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनी व नागरीक उपस्थित होते.














