prabodhini news logo
Home ठळक बातम्या भंडारा वाशियांना घरकुल उपलब्ध करुन द्या – जिल्हा इंटकची मागणी

भंडारा वाशियांना घरकुल उपलब्ध करुन द्या – जिल्हा इंटकची मागणी

0
71

नरेश गजभिये
भंडारा जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क

भंडारा – दिनांक १०/८/२०२३ रोज गुरुवारला जिल्हा इंटकतर्फे भंडारा जिल्हाधिकारी यांना भंडारा शहर वाशियांना घरकुलाचे निवेदन देण्यात आले. निवेदणात जिल्हा अधिकारी यांना विनंती करण्यात आली आहे कि, शहरात बरेच व्यक्ती उघड्यावर संसार करीत आहेत. ब-याच लोकांकडे रिकामे प्लाट उपलब्ध असुन त्यांना आज पर्यंत घरकुल मिळाले नाही किंवा घरकुलाच्या यादिमध्ये त्यांच नाव नाही. ज्यांना राहायला घर नाही अशा व्यक्तीला घरकुल मिळत नाही व ज्यांच्याकडे घर उपलब्ध आहे अशानां घरकुल मिळत आहेत. तरी भंडारा शहरात घरकुलाचे पुन्हा निरीक्षण करुन गरजु लोकांना घरकुल उपलब्ध करुन घ्यावे अशा आशियाचे निवेदन उपजिल्हा अधिकारी मा. फडके मॅडम यांना देण्यात आले. निवेदन देतांना माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे, इंटकचे जिल्हा अध्यक्ष धनराज साठवने, कांग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस सांस्कृतिक विभागाचे सरचिटणीस महेंद्र वाहाणे, शहर अध्यक्ष प्रशांत देशकर, मानिकराव गायधने, अल्पसंख्यक विभागाचे सरचिटणीस अनिक जमा पटेल, शहर महासचिव मेहमुदभाई खान, महासचिव लखन चवरे, सांस्कृतिक विभागाचे जिल्हा संघटक राजविलास बोरकर, इंटकचे उपाध्यक्ष जिवन भजनकर, शहर महिला अध्यक्षा स्नेहा भोवते, नरेंद्र साकुरे, लियाकत खान, नाहिद परवेज, सुनिल नागपुरे, धर्मेंद्र गणविर, भावेश नागपुरे, इत्यादि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here