prabodhini news logo
Home ठळक बातम्या श्री. गुरुदेव सेवा मंडळ लाखांदूर तर्फे लाखांदूर येथे क्रांती दिन व जागतिक...

श्री. गुरुदेव सेवा मंडळ लाखांदूर तर्फे लाखांदूर येथे क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

0
92

नरेश गजभिये
भंडारा जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क

श्री गुरुदेव सेवा मंडळ तालुका लाखांदूर तर्फे 9 ऑगस्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त रक्तदान शिबिर श्री गुरुदेव सेवा मंडळ लाखांदूर च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 9 ऑगस्ट 2023 बुधवार ला क्रांतिदिन व जागतिक आदिवासी दिन दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये एकूण 53 रक्तदात्यांनी रक्तदान केले. भारतीय भूमी ही सातत्याने नवीनतम कर्याकरिता आणि क्रांती करिता विश्वविख्यात आहे. याच भूमीतून खरी क्रांती उदयास आली.म्हणून शेकडो हजारो अशा संख्येतही न बसणाऱ्या क्रांतिवीरांनी आपल्या रक्ताचा थेंब देऊन इथल्या मातीसाठी स्वतःचं संपूर्ण जीवन बलिदान केले. त्या क्रांतिवीरांच्या क्रांतीला स्मरण करण्याकरिता वंदन, करण्याकरिता 9 ऑगस्ट हा क्रांती दिन असतो. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी उन्नीसो ब्यालीस को,मुझको भी जेल जाना पडा क्रांती हुई बडी जोर की आवाज मुझसे ही चढा या शब्दांमध्ये त्यांचा क्रांतिकारी असणारा सिंहाचा वाटा अधोरेखित केला आहे. त्यांचे सेवक म्हणून आणि मानवतेच्या विचारांचे कार्यकर्ते म्हणून दरवर्षीप्रमाणे यावर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन गुरुदेव सेवा मंडळ यांनी केले . त्यात बहुसंख्य गुरुदेव उपासक आणि 53 रक्तदाते यांनी रक्तदान केले.
प्रथमता कार्यक्रमाची सुरुवात श्री. गुरुदेव सेवा मंडळ लाखांदूर च्या वतीने भजनाद्वारे करण्यात आली त्यानंतर क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटक मा. प्रियंक बोरकर जि. प. सदस्य, अध्यक्ष मा. प्राचार्य जी व्ही दडवे सर यशवंतराव चव्हाण महाविद्यालय लाखांदूर, मा. राजू पठाण नगरसेवक लाखांदूर, मा. बबलू नागमोती गटनेता नगरपंचायत लाखांदूर, मा. देविदास पारधी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती लाखांदूर, श्रीकांत दोनाडकर कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव
प्राध्यापक भारत नखाते, रामचंद्र राऊत माझी गटनेता डॉक्टर दत्तात्रेय ठाकरे, मा. सुरेश ब्राह्मणकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती लाखांदूर मा.सोफिया पठाण नगरसेविका, मा. रमाकांत कोकाटे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन लाखांदूर, मा. रमेश भैया अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ लाखांदूर, गोविंदराव भुरले गुरुजी उपाध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळलाखांदूर मा. अर्चना भोंगाडे अध्यक्ष श्री गुरुदेव महिला मंडळ लाखांदूर यांचे उपस्थितीत 9 ऑगस्ट क्रांती दिनाचा कार्यक्रम व रक्तदान शिबिराचा कार्यक्रम पार पडला. राष्ट्र वंदनेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here