prabodhini news logo
Home ठळक बातम्या पळसगाव (जाट) येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

पळसगाव (जाट) येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

0
72

कपिल एस. मेश्राम
ता. प्रतिनिधि, सिंदेवाही

सिंदेवाही – दिनांक १०/०८/२०२३ रोजी ग्रामपंचायत पळसगाव जाट येथील गट क्रमांक ८३७ या शासकीय अतिक्रमीत जागेवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी महसूल विभाग, वन विभाग व पोलीस विभाग यांचे सहकार्यने पोलीस बंदोबस्तात वृक्ष लागवड करण्यात आली.
यावेळी धात्रक व तुमराम नायब तहसीलदार, महल्ले पोलीस उपनिरीक्षक, हटवार व चहांदे वन विभाग, तोडसाम मंडळ अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
जगदीश कामडी सरपंच, संतोष गायकवाड उपसरपंच, रमेश बनकर सदस्य, सचिन सहारे सदस्य, सुधीर मंडाळी सदस्य, सुभाष सुकारे सदस्य, सुभाष कोलते पोलीस पाटील तसेच खरकाटे तलाठी, अशोक शिंदे ग्रा.वि. अ. हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here