prabodhini news logo
Home ठळक बातम्या राहुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी आज श्री.छत्रपती शिवाजी हायस्कुल...

राहुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी आज श्री.छत्रपती शिवाजी हायस्कुल व जुनिअर कॉलेज श्रीशिवाजीनगर येथे विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला

0
89

जालिंदर आल्हाट
ब्युरो चीफ
अहमदनगर

राहुरी फॅक्टरी येथे शनिवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज श्री. शिवाजीनगर येथे विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य संसारे सर यांनी अध्यक्षपद भुषविले. जाधव यांनी विद्यार्थ्यांना सोशल मिडीयाचा वापर कमी करावा. तसेच गुड टच बॅड टच या संदर्भात मार्गदर्शन केले.तसेच विद्यार्थ्यांना आपली सर्वात जवळची मित्र आपली आई बहीण ही असते.त्यांना आपण या सर्व गोष्टी सांगाव्यात.तसेच कायद्यातील विविध कलमे यांचीही माहीती सांगितली.तसेच काही अडचण असल्यास ११२ या क्रमांकावर संपर्क करावा.तसेच दिवसातील २४ तासात कधिही काही समस्या आल्यास संपर्क साधण्यासाठी आपले मोबाईल क्रमांक विद्यार्थ्यांना देऊ केले व संपर्क करण्यास सांगितले. मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयाचे प्राचार्य संसारे व पर्यवेक्षिका साळवे यांचे मार्गदर्शनाखाली शिरसाठ, तांबे, गाडे, यांचेसह विद्यालयाचे NCC Officer संदिप गोसावी व गणेश विघे,भाऊसाहेब पगारे यांनी परीश्रम घेतले. निमसे यांनी योग्य नियोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here