
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि,सिंदेवाही
सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त्य संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या वतीने देलनवाडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा या ठिकाणी विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर सिंदेवाही तालुक्यातील समता दूत कृपाली धारणे यांनी शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिन म्हणून साजरा का करतात.हे विविध उदाहरणे देऊन मुलांना समजून सांगितलं डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अथांग परिश्रमाने आपल्यासाठी जे बलिदान दिले त्याग केला हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापक अंजली करंबे,अनिल लोणबले, व्हीं के गेडाम, एस .पी. नागापुरे, यु. व्ही. वानखेडे, आर. सी. गेडाम उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन नागापुरे यांनी केले तर आभार शालेय विद्यर्थी यांनी मानले.














