वंदना कावळे
उपसंपादक, चंद्रपूर
बल्लारपूर – दि. 7/11/2023 आम आदमी पार्टी द्वारे सलग दोन वर्षांपासून शहरात 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन आणि पार्टी स्थापना दिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यंदाही पक्षातर्फे 26 नोव्हेंबर चा कार्यक्रम गणपती वॉर्डातील शगुण लॉन समोरिल मैदानात आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीच्या अनुशंगाने शहरातील पीडब्लुडी गेस्ट हाऊस मध्ये जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार यांच्या नेतृत्वात बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली. बैठकीस जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, जिल्हा उपाध्यक्ष सुरज ठाकरे, योगेश मुर्हेकर, सचिव दोरखंडे, संघठनमंत्री प्रा. नागेश्वर गंडलेवार, भिवराज सोनी, बल्लारपूरचे शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, भद्रावती शहराध्यक्ष सुरज शहा, तसेच जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

