prabodhini news logo
Home चंद्रपूर ईंनेर व्हील ला या वर्षी 100 वर्षे पूर्ण झाले; त्यानिमित्ताने वेगवेगळे उपक्रम...

ईंनेर व्हील ला या वर्षी 100 वर्षे पूर्ण झाले; त्यानिमित्ताने वेगवेगळे उपक्रम राबविले जातात

0
77

सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज

Inner wheel Dist. 303 च्या अध्यक्षा शीला देशमुख यांनी चंद्रपूर क्लब ला भेट दिली त्यावेळी चंद्रपूर रेल्वे स्थानकावर प्रतिक्षालयात टाकाऊ वस्तू पासून बनलेले एक इंजिन भेट देण्यात आले. संपूर्ण भारत देशात इनर व्हील चे एकूण 27 डिस्ट्रिक्ट असून 1588 क्लब आहेत तर 52,174 सदस्या आहेत. वर्षभरात कोणत्याही राज्यात अनेक कार्यक्रम होतात. तेव्हा आम्ही इनेर व्हील च्या सदस्या मोठ्या विश्वासाने आणि आस्थेने भारतीय रेल्वे ने प्रवास करतो. आणि यावर्षी 2023 ला इनर व्हील ला 100 वर्षे पूर्णे झाली आहेत. त्याचे निमित्त साधून चंद्रपूर क्लब ने हे प्रतीक म्हणून चंद्रपूर रल्वे स्थानक परिसरात भेट दिले आहे. तसेच सोबत आजारी आणि वृद्ध प्रवाश्याना मदत म्हणून व्हील चेअर चे लोकार्पण शीला मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी क्लब च्या अध्यक्ष राखी बोराडे, सचिव अंजली उत्तरवार PDC कीर्ती चांदे, पूर्वाध्यक्ष विद्या रघुषे, साधना उपगाणलावर, उपाध्यक्ष अर्चना उचके, प्रकल्प निर्देशक रिंकू सुराणा, पल्लवी तेलंग, मनीषा लांबट, कविता झाडे आणि स्टेशन उप प्रबंधक तिरपुडे आणि चंदेल सर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here