prabodhini news logo
Home ठळक बातम्या वडगाव शेरी मतदार संघात बीआर एस तर्फे स्वच्छता मोहीम

वडगाव शेरी मतदार संघात बीआर एस तर्फे स्वच्छता मोहीम

0
83

योगिता जाधव
जिल्हा संपादक
प्रबोधिनी न्युज, पुणे

पुणे: भारत राष्ट्र समिती वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ सह समन्वयक अजिंक्य रमेश शेडगे आगामी काळात येत असलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शिवाजी ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष युवराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांची मोठी फळी उभी रहात आहे. स्वच्छता हीच खरी राष्ट्र सेवा मानुन जनसामान्यांच्या मनात आपली जागा निर्माण करा असा सल्ला युवराज देशमुख यांनी तरुणांना दिला आहे. राजकीय व्यूहरचनाकार अभिजीत आपटे यांचा सल्ला आणि युवराज देशमुख यांचे नेतृत्व पुण्यासह राज्यातील सर्वच मतदार संघात बीआर एस ला यश मिळवून देईल.
महाराष्ट्रात मतदारांशी नाळ जुळवण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक कार्यकर्त्याने कचरा पडणा-या ठिकाणांवर जाऊन नागरिकांशी संवाद साधावा आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यावे हा गुरूमंत्र रणनितीकार अभिजीत आपटे यांनी दिला आहे. अजिंक्य शेंडगे यांनी केलेली सुरवात प्रेरणादायी आहे असे मत युवराज देशमुख यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here