prabodhini news logo
Home चंद्रपूर सेवानिवृत्ती समारोहात सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन

सेवानिवृत्ती समारोहात सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन

0
107

ऊर्जानगरच्या भजनकर परिवाराचा स्तुत्य उपक्रम

शैलिका सागवरे
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

ऊर्जानगर (चंद्रपूर) – महानिर्मितीच्या चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्र ऊर्जानगर येथून 31 वर्षाची प्रदीर्घ सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले ऊर्जानगर वसाहतीतील गुरुदेव सेवक श्री राजीराम मोतीराम भजनकर यांनी आपल्या स्नेहबंध सभागृह येथे घेण्यात आलेल्या सेवानिवृत्ती समारोह कार्यक्रमात श्रीगुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगर वसाहतच्या वतीने कार्यक्रमाच्या सुरुवातीला वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची सामुदायिक प्रार्थना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली हा स्तुत्य उपक्रम राबवून गुरुदेव सेवा मंडळाचा प्रचार प्रसार करण्यास हातभार लावून समाजात आगळावेगळा उपक्रम राबविण्याचा भजनकर परिवाराकडून प्रयत्न करण्यात आला. राजीराम भजनकर हे अत्यंत साधी राहणी उच्च विचार श्रणीचे व्यक्तिमत्त्व असून अल्कोलीक अँनमस (AA) या विश्वपातळीच्या सामाजिक संस्थेत व्यसनमुक्तीचे कार्य करत असून श्री. गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन सदस्य आहेत.त्यांचा मध्यंतरीचा व्यसनाचा काळ कठीण परिस्थितीतून काढून ते आता व्यसनमुक्तीचे जीवन जगत असून नेहमी आपला समाज व व्यक्ती व्यसनमुक्त कसे होतील याकडे विशेष प्रयत्न करीत आहे. स्नेहबंध सभागृह येथे झालेल्या सामुदायिक प्रार्थनेला श्री. गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रशांत दुर्गे, अशोक धमाणे, देवराव कोंडेकर, मुरलीधर गोहणे, विलास उगे, रामदास तुमसरे, बंडू कुलमेथे,हरीचंद्र देवतळे, सुयोग वऱ्हाटे, ऋग्वेद कोंडेकर तसेच इंदू वऱ्हाटे, आशा भजनकर, मालू कोंडेकर, सुषमा उगे, सुनंदा दडमल, पूजा भजनकर, ऋतुजा कोंडेकर, शितल भजनकर तसेच भजनकर परिवारातील सदस्य, मित्र परिवार व श्रीगुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगरचे सदस्यगण आणि ऊर्जानगरवासीयांची उपस्थिती होती. या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here