prabodhini news logo
Home चंद्रपूर “आप” बल्लारपूरने जननायक क्रांतिकारि बिरसा मुंडा जी यांची जयंती साजरी

“आप” बल्लारपूरने जननायक क्रांतिकारि बिरसा मुंडा जी यांची जयंती साजरी

0
82


सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज

बल्लारपूर- आज दि- 15/11/2023 बुधवार रोजी आम आदमी पार्टी बल्लारपूर शहर अध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वाखाली, जिल्हा संघटन मंत्री प्रा. नागेश्वर गंडलेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत धरती आबा, महान जननायक क्रांतीचे प्रणेते बिरसा मुंडा यांना जयंतीदिनी टेकडी विभागातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
जल, जंगल आणि जमीन यांच्या रक्षणासाठी बिरसा मुंडा जी यांचे धैर्य, नेतृत्व आणि त्याग या देशातील जनतेला नेहमीच प्रेरणा देत राहील.
यावेळी शहर उपाध्यक्ष सय्यद अफजल अली, शहर सहसचिव आशिष गेडाम, शहर प्रवक्ते आसिफ हु. शेख, शहर युवा अध्यक्ष सागर कांबळे, अनु. जमाती शहराध्यक्ष अतुल माळावी, प्रज्वल चौधरी, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here