अभय कुंभारे हे आंबेडकरी कार्यकर्ता समर्पित गौरव पुरस्काराने सन्मानित

0
80


वर्धा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

वर्धा : समता समता सैनिक दल द्वारा आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह उर्वेला कॉलनी,वर्धा रोड नागपूर येथे मार्शल एडवोकेट विमलसूर्य चिमणकर सर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वर्धा जिल्हा संघटक मार्शल अभय कुंभारे यांना आंबेडकरी समर्पित कार्यकर्ता गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्शल प्रकाश दार्शनिक राष्ट्रीय बौद्धिक प्रमुखसमता सैनिक दल,प्रमुख अतिथी म्हणून मा.रणजित मेश्राम,आंबेडकरी चिंतक,मा.देवेश चौधरी,संपादक तिसरा पक्ष, जबलपूर म.प्र., मा. प्राचार्य सिद्धार्थ मेश्राम, सेवानिवृत्त, मुख्य संयोजक-विहार, स्तुप,चैत्य,एवं लेनी संवर्धन विंग.स.सै. दल, मा.इजि.अरविंद मेश्राम, अध्यक्ष बानाई, नागपूर मा.इजि.पद्माकर पाटील, जलसंपदा मैत्री संघ,नागपूर हे उपस्थित होते. विशेष उपस्थिती म्हणून मा.सुधाकर सोमकुंवर,प्रकाशक, समता संगर प्रकाशन हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्र्यार्पण करण्यात आले त्यानंतर दोन मिनिटे मौन पाळून मार्शल एडवोकेट विमलसूर्य चिमणकर सर यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मार्शल एडवोकेट मार्शल विमलसुर्य चिमणकर सर लिखित”दुसरे महायुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर” या प्रसिद्ध अशा पुस्तकाच्या तिसऱ्या मराठी आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यावेळी केंद्रीय संघटक मा. सुनील सारीपुत्त, राष्ट्रीय बौद्धिक प्रमुख माननीय प्रकाश दार्शनिक, मा.रणजित मेश्राम यांच्या हस्ते अभय कुंभारे यांना शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
“दुसरे महायुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका” या विषयावर उपस्थित मान्यवरांनी सखोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय मार्शल दिलीप तायडे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन आंध्र प्रदेश राज्य संघटक मार्शल मार्शल रोहन बोधी सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार महाराष्ट्र सहसंघटक सहसंघटक मार्शल अनिकेत उबाळे यांनी मानले. त्याचे मार्शल प्रदीप कांबळे, पुंडलिक गाडगे, लांबे,मार्शल चंदु भगत,मार्शल अमोल ताकसांडे, मार्शल मनोज थुल, मार्शल प्रिती आष्टेकर, मार्शल वंदना वासनिक, मार्शल आशिष पाटील, मार्शल अक्षय भगत,अर्पित वहाणे,निखिल खडसे, रोशन कांबळे, प्रा.विनोद राऊत,प्रा.ममता राऊत,तुळशीराम राऊत, अजय कुंभारे, विजय कुंभारे,मुख्याध्यापिका सविता कुंभारे, रघुनाथ पिंपळकर,मंगेश झामरे, संध्या झामरे, छाया पिंपळकर,वंदना वाघमारे, विनयराज वाघमारे आदींनी अभिनंदन केले. कार्यक्रमाला विविध राज्यातील पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here