prabodhini news logo
Home अमरावती राज्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून तृतीय क्रमांकाने पोही ग्रामपंचायतला सन्मानित

राज्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून तृतीय क्रमांकाने पोही ग्रामपंचायतला सन्मानित

0
116

अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज अमरावती

अमरावती : जिल्ह्यातील (अंजनगाव सुर्जी) प्रधानमंत्री आवास योजना राज्यातून सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत आवास योजना श्रेणीमध्ये सरस कामगिरीसाठी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पोही ग्रामपंचायतला सन्मानित करण्यात आले असून गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबई येथील यशवंराव चव्हाण सेंटर मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते पुरस्काराच्या वितरण सोहळा पार पडला.
महाआवास अभियान पुरस्कार 2021-22 पीएम आवास राज्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून तृतीय क्रमांकाने पोही ग्रामपंचायतला पुरस्कृत करण्यात आले.तर तृतीय क्रमांक पटकावून पोही ग्रामपंचायतला 95.00 टक्के गुण प्राप्त झाले आहे.हा सन्मान अंजनगाव सुर्जी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी स्वीकारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here