
रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
ब्रम्हपूरी शहराचे शिक्षण व आरोग्य विषयक सोयींसाठी अवघ्या विदर्भात नावलौकिक प्राप्त आहे. मात्र ह्याच शहरात क्रिडा स्पर्धांना देखील मोठा वाव असुन येथील अनेक खेळाडूंनी विविध क्रिडा स्पर्धांमध्ये आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावर देखील मजल मारली आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर यावर्षी या शहरात राज्यस्तरीय महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा व तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने डिसेंबर महिन्यात केले आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 10, 11 व 12 डिसेंबर 2023 रोजी 25 वी वरिष्ठ महिला आणि 6 वी सब ज्यूनियर राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व 2 री महिला महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतुन जवळपास 600 महिला कुस्तीगीर या स्पर्धेसाठी येणार असुन भव्यदिव्य स्वरुपात ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेचे प्रायोजक राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे असणार आहेत.
याबाबतची नियोजन बैठक स्थानिक विश्रामगृहात पार पडली. या बैठकीच्या प्रसंगी कुस्तीगीर संघाचे जिल्हा अध्यक्ष मा. शरद टेकुलवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ राजेश कांबळे, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष नरेंद्रभाऊ गाडगिलवार, कुस्ती प्रशिक्षक विनोद दिवटे, सामाजिक कार्यकर्ते मोंटुभाऊ पिलारे, माजी न.प.उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, सुरज मेश्राम, अमित कन्नाके, किशोर राऊत, अतुल राऊत, कृपाल मेश्राम, गोपाल भानारकर, धनराज चौधरी, नाकाडे सर, सुधीर पंदीलवार, लक्ष्मण जिभकाटे, मुन्ना रामटेके, पै.अमोल ठेंगरी यांसह तालुक्यातील कुस्तीगीर, जिल्हा व तालुका कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीचे संचालन प्रा. प्रशांत मेश्राम यांनी केले.














