
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
सिंदेवाही – जननायक बिरसा मुंडा जयंती उत्सव समिती लोनवाही – सिंदेवाही, ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर व्दारा आयोजित जननायक बिरसा मुंडा जयंती उत्सव आदिवासी समाजातील थोर क्रांतीकारक, जननायक ‘बिरसा मुंडा’ यांची १४८ वी जयंती दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोज शनिवार ला सिंदेवाही शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे, तरी सदर जयंती उत्सव निमित्य आयोजित समाज प्रबोधन तथा सांस्कृतिक कार्यक्रमाकरीता आदिवासी समाजातील बंधु भगिनी – तथा युवक – युवती यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन जयंती उत्सव यशस्वी करण्याकरीता सहकार्य करावे, ही नम्र विनंती शनिवार दुपारी १२ ते सायं. ५ वाजेपर्यंत. स्थळ- ताल्लेवार सभागृह सिंदेवाही येथे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक मा. विजय कुंभरे, जिल्हाध्यक्ष ऑफ्रोट संघटना चंद्रपूर व विशेष अतिथी मा. शंकर मडावी, जिल्हा सरचिटणीस ऑफ़ोट संघटना चंद्रपूर हे उपस्थित राहणार आहे. सिंदेवाही परिसरातील आदिवासी समाजातील बंधू भगिनींनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आव्हान राजु ताडाम, अध्यक्ष ऑफ़ोट संघटना सिंदेवाही यांनी केले आहे.














