वनमंत्री, पालकमंत्री आणि वनअधिकाऱ्यावर 302 चे गुन्हे दाखल करा- महेंद्र ब्राह्मणवाडे
शैलिका सागवरे
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
गडचिरोली-मरेगाव येथील युवकास रानटी हत्तीने चिरडले. युवकाचा जागीच मृत्यू झाला. धान पीक कापणीवर आले आहे, जिल्ह्यातील अनेक भागात कापणी व मळणीचे काम चालू झाले आहेत त्यामुळे अनेक शेतकरी बांधवाना जास्तीत जास्त वेळ शेतात राहावं लागत आहे, अश्यात जंगली हत्ती आणि नरभक्षक वाघाचाही हला वाढत चाललं आहे. हत्तीकडून हातात आलेल्या पिकाची नुकसान होत असल्याने नाईलाजास्तव धानाची राखण करावी लागत आहे, मात्र इतक्या दिवसात हत्ती आणि वाघाचे हल्ले वाढत चालले असतानाही वनविभागाकडे अद्यापही अत्याधुनिक ड्रोन कॅमेरे नाहीत, जेणे करुन ज्या गावाशेजारी हत्ती असतील त्यांचा शोध घेऊन तेथील शेतकऱ्यांना सतर्क करू शकतील. अश्या ह्या हलगर्जीपणामुळे शेतकरी बांधवाना जीव गमावावा लागत आहे, त्यामुळे वनमंत्री, पालकमंत्री आणि वनअधिकाऱ्यावर सरसकट 302 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.

