prabodhini news logo
Home चंद्रपूर ब्रम्हपूरी नगरपरिषद मध्ये संविधान दिन साजरा

ब्रम्हपूरी नगरपरिषद मध्ये संविधान दिन साजरा

0
86

रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

ब्रम्हपूरी येथील नगरपरिषद मध्ये आज दि. 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. व भारतीय राज्यघटनेने शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. रिताताई उराडे, नगरपरिषद उपाध्यक्ष अशोक रामटेके, नगरसेवक डॉ. नितीन उराडे, न.प. मुख्याधिकारी अर्शिया जुही, बांधकाम विभागाचे अभियंता आंबोरकर, वरिष्ठ लिपिक दर्वे, धनंजय हटवार यांसह अन्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मुख्याधिकारी अर्शिया जुही म्हणाल्या की, आपल्या भारत देशात दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाच्या संविधान सभेने सध्याची राज्यघटना स्वीकारली. त्यामुळे या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी देशात सर्वत्र ‘संविधान दिन’ साजरा केला जातो. भारतातील विविध धर्म आणि जातींच्या १४० कोटी लोकसंख्येला एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे.आपल्या देशाचे सर्व कायदे या राज्यघटनेने बनवलेले आहेत.या संविधानांतर्गत सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, संसद, राज्य विधिमंडळ, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यासह देशातील सर्व न्यायालये त्याअंतर्गत काम करतात. शिवाय, याच संविधानाने आपल्या अनेक हक्क दिले आहेत ज्यामुळे आपण संपूर्ण स्वातंत्र्य आणि समानतेने जीवन जगतो. देशातील नागरिकांमध्ये घटनात्मक मूल्यांबद्दल आदराची भावना वाढवणे हा संविधान दिनाचा मूळ उद्देश आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here