
शैलिका सागवरे
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
भद्रावती- आज दि. 27 नोव्हेंबर 2023 रोजी आंतरराष्ट्रीय बजरंग दल कडून गौवंश तस्करी करणारा ट्रक पकडुन कार्यवाही करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बजरंग दल चे कार्यकर्ते दिपक तूरारे, सुरज शाहा यांना गुप्त सूचनेच्या आधारावर माहिती मिळाली की भरधाव ट्रक हा मध्यप्रदेश वरून नागपूर रोड नी येत असून गडचंदूरला कत्तल खान्यावर ग्रामीण मार्गाने जात आहे. ही बाब लक्षात येताच दीपक तुरारे व सुरज शहा यांनी ट्रक न. CG 08 AT 8086 हा ट्रक बेलोरा ता. भद्रावती या मार्गाने जाताना आढळला. ट्रक ड्रायव्हरला कळाले की आमच्या मागे कोणीतरी पाठलाग करत आहे म्हणून ट्रक ड्रायव्हर व त्याच्या साथीदार ट्रक बेलोरा गावात सोडून पडून जाण्याच्या मार्गाने लागले होते. तेव्हाच एक आरोपी हा मिळाला असून ट्रक ड्रायव्हर फरार झाला आहे व त्या आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 50 गोमाता व काही बछडे यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले व आंतरराष्ट्रीय बजरंग दल मार्फत कारवाई करून जीवनदान देण्यात आले. गोवंश तस्करी कायदा लागू असताना असे प्रकार घडत असेल तर सरकारवर कुठेतरी प्रश्नचिन्ह उभे होताना दिसत आहे.
यावेळी आंतरराष्ट्रीय बजरंग दलचे कार्यकर्ते दिपक तुरारे सुरत शहा सुमित हस्तक नितीन बावणे, अनेक कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.














