
सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज
वसमत: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांची स्वायत्त संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे मार्फत राबविण्यात येत असलेल्या भारतीय संविधानाचा प्रचार प्रसार व त्या मूलतत्त्वाचे महत्व भारतीय नागरिकांना कळावे या अनुषंगाने सबंध महाराष्ट्र राज्यामध्ये दिनांक 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन असून या दिनाचे महत्व नागरिकांना समजावे या हेतूने बार्टी मार्फत संविधान दिन सप्ताह साजरा करत असताना हिंगोली जिल्हा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोंवदे यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत तालुका येथे सविधान दिनानिमित्त विविध स्पर्धा परीक्षा व इतर प्रबोधनात्मक कार्यक्रमाची नियोजन केले होते या कार्यक्रमाचे नियोजन
वसमत तालुका समतादुत गुरूनाथ गाडेकर यांनी विविध ठिकाणी प्रबोधनात्म कार्यक्रम घेऊन तालुक्यातील बालाजी मुळे, इंगोले, काळे, गजभार,भगत, रवि खंडागळे, संतोष नागरे, मिलींद आळणे, सरोदे, बुजवणे,आदी सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने तालुक्यात संविधान रॅलीचे आयोजन करून संविधान व राष्ट्रीय एकात्मता या विषयावर प्रबोधन करून बार्टी मार्फत संविधान स्पताहाचे महत्व व त्या अंतर्गत आज महात्मा फूले यांच्या स्मृती दिनानिमित्त निमित्त जि.प.शाळा कुरूंदा येथे त्यानां अभिवादन करुन समतादुत गुरूनाथ गाडेकर यांनी महात्मा फुले यांच्या कार्याविषयी प्रबोधन केले.या वेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षिका, व सेवक उपस्थित विद्यार्थी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.














