prabodhini news logo
Home चंद्रपूर तळोधी खुर्द येथे खास कार्तिक पौर्णिमेनिमित्त “सौभाग्याचं लेन” नाटकाचे आयोजन

तळोधी खुर्द येथे खास कार्तिक पौर्णिमेनिमित्त “सौभाग्याचं लेन” नाटकाचे आयोजन

0
157

माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले

अँड.वंदना कावळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज

तालुक्यातील मेंडकी येथे कार्तिक पौर्णिमेला खास कार्तिक गोपालकाला जागरणनिमीत्त स्व. राजीव गांधी सभागृह तळोधी खुर्द येथे सार्वजनिक एकता नाट्य कला मंडळ, तळोधी खुर्द यांच्या वतीने “सौभाग्याचं लेन” या तीन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आलं होते. या नाटकाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते पार पडले.
या नाटकाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रभाकरजी सेलोकर सभापती कृ.उ.बा.स. ब्रम्हपुरी उपस्थित होते. कार्यक्रमाला सहउद्घाटक म्हणून अनिल तिजारे सरपंच तळोधी खुर्द, उपाध्यक्ष म्हणून प्रमोद मोटघरे अध्यक्ष अ.जा.ता.काँ.क. ब्रम्हपुरी, ईश्वर ठाकरे माजी सरपंच तळोधी खुर्द उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून वकार खान सचिव शहर.काँ.क. ब्रम्हपुरी, सत्यमजी मोटघरे बँक मॅनेजर ब्रम्हपुरी, संजय मारभते उपसरपंच तळोधी खुर्द, हिरालाल रामटेके सदस्य ग्रा.पं.तळोधी खुर्द, वंदना सागरकर सदस्य ग्रा.पं. तळोधी खुर्द, लता ठवकर सदस्य ग्रा.पं.तळोधी खुर्द, डॉ. वाढनकर, मारोतराव तिवाडे मा.सरपंच, तुषार खरवडे ज्वेलर्स गांगलवाडी, तामराव भोयर, हेमंत पानसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या नाटकाच्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रमोद चिमूरकर म्हणाले की, कार्तिक पौर्णिमा हा कार्तिक मासातील पूर्णिमेला साजरा होणारा सण आहे. आपल्याकडे कार्तिक पौर्णिमेला गोपाळकाल्याचे आयोजन केले जाते. कार्तिक पौर्णिमेला ‘देव दीपावली’ म्हणूनही संबोधले जाते. या शुभदिनी आपण आपल्या गावातील कलाकार मंडळी यांच्यातील कलेला प्रोत्साहन देत सौभाग्याचं लेन या नाटकाचे आयोजन केले आहे. ते खूप स्तुत्य उपक्रम आहे. ह्या अश्या कार्यक्रमाच्या औचीत्याने आपण सर्व एकत्र येतो विचारांची देवाणघेवाण होते. असे प्रतिपादन केले.
कार्तिक पौर्णिमेला खास कार्तिक गोपालकाला जागरणनिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या नाटकाचा तळोधी खुर्द येथील जनतेने आनंद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here