थोरसमाज सुधारक शिक्षण सम्राट क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा राव फुले यांच्या पुण्यतिथी साजरी

0
40

परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

आज परभणी शहरातील महात्मा ज्योतिबा राव फुले चौक दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री सात वाजता अभिवादन पूजन राष्ट्रजन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य प्रणित वीर वारकरी सेवा संघाच्या वतीने अभिवादन पुष्पहार घालून करण्यात आली याप्रसंगी महात्मा ज्योतिबाराव फुले समितीचे सदस्य बंडू म्होत्रे, बालाजी दुधारे जगदीश महाजन सोनपेठकर थोरात
कार्यक्रमाचे संयोजक राष्ट्रजण फाउंडेशन परभणी चे संस्थापक अध्यक्ष तथा वीर वारकरी सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी प्रास्ताविक मध्ये बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांची सर्व प्रथम समाधी शोधून शिवजयंती साजरी करणारे, मुलींच्या शिक्षणाचे आद्य प्रवर्तक , शोषित समाजाचे आधार स्तंभ, अनिष्ठ रुढी अंधश्रद्धेवर तसेच शेतकरी तसेच बहुजन समाजाच्या समस्यांवर वज्रप्रहार करणारे सत्यशोधक समाज संस्थेचे संस्थापक, समानता आणि सत्यासाठी देह झिजवणारे, सामाजिक & शैक्षणिक क्रांतीची ज्योत पेटवणारे थोर विचारवंत & क्रांती सुर्य – महात्मा जोतिबा फुले शिका शिक्षणाकडे जास्त लक्ष द्या प्रत्येकाने शिक्षण करून व्यवसाय धंदे किंवा शाळा कॉलेज काढा गोरगरीब जनतेसाठी महापुरुषांचा आदर्श घ्या हीच खरी महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी साजरी होईल अशी माहिती प्राणिमित्र नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here