हिरडगाव ग्रामपंचायत च्या सरपंच पदी दिपाली दरेकर यांची बिनविरोध निवड

0
74

सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज

श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या हिरडगाव ग्रामपंचायत च्या सरपंच पदाची आज निवडणूक पार पडली या निवडणुकीत विद्यमान आमदार मा. बबनराव दादा पाचपुते व खासदार मा. सुजय विखे पाटील साहेब व कै प्रा तुकाराम दरेकर यांच्या गटाची दिपाली नानासाहेब दरेकर यांची विरोधी गटाचे चार सदस्य गैरहजर राहिल्याने बिनविरोध निवड झाली नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे जनरल महिलेसाठी राखीव आहे! सुनिता अनिल दरेकर ह्या या पदावर विराजमान झाल्या सुमारे अडीच वर्षांनंतर मनाचा मोठेपणा दाखवून इतरांनाही संधी मिळावी या उदात्त हेतूने त्यांनी स्वतः होऊन राजीनामा दिला आणि आज दिपाली नाना दरेकर यांची बिनविरोध निवड झाली! दिपालीच्या मागे खंबीरपणे उभे राहीलेले सदस्य चिमाजी आप्पा दरेकर विद्यमान उपसरपंच अमोल विलास दरेकर सदस्य, सुनिता अनिल दरेकर माजी सरपंच व विद्यमान सदस्य, विद्या रामदास बनकर सदस्य, या सर्व घडामोडी पार पाडण्यासाठी अनेक ज्ञात, अज्ञात हातांनी मदत केली! निवडी नंतर सोसायटीचे चेअरमन झुंबराव दरेकर सामाजिक कार्यकर्ते संपत आण्णा दरेकर कुकडी कालवा सल्लागार समितीचे सदस्य मिलीद दरेकर, युवा नेते संतोष दरेकर यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here