रत्नापूर येथे शासकीय आधारभुत धान खरेदीचा शुभारंभ

0
133

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे शेतकरी जनतेचे हीत जोपासणारी शेतकरी जनता सभासद असणारी सेवा सहकारी संस्था मर्या रत्नापूर र न. 3 3 4 ही कार्यरत आहे. सदर संस्थेला शासनाने शासकीय आधारभुत धान खरेदी केंद्र म्हणून मंजुरी दिली आहे. त्यामुळे ह्या संस्थेमार्फत शेतकरी जनतेचे धान खरेदी करण्याचा शुभारंभ नुकताच संस्थेचे उपाध्यक्ष मधुकर मेश्राम यांचे हस्ते पार पडला. ह्यावेळी संस्थेचे संचालक जितेंद्र बोरकर, संदीप डोंगरवार, योगीदास लोधे, पुरुषोत्तम लोखंडे, विवेक लोधे ,मंगेश बोरकर ,रंजीत मेश्राम ,प्रभु ढोक संस्थाचे सचिव दिनेश्वर लोधे, तमुस अध्यक्ष बालाजी लेंझे, प्रतीष्ठीत शेतकरी सुरेश लोधे, कर्मचारी श्रीधर कोपूलवार, सोमेश्वर ठीकरे आदी सह शेतकरी उपस्थीत होते. सर्व या ऑनलाईन केलेल्या शेतकरी बांधवाना आपला धान येथे शासनाने ठरवून देलेल्या कीमतीनुसार विकता येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here